स्मार्ट बँकिंग

विवेकानंद अर्बन

NEFT-RTGS-IMPS

आता व्यवहार अधिक जलद, सुरक्षित आणि आधुनिक! विवेकानंद अर्बन आपल्यासाठी घेऊन आली आहे स्मार्ट बँकिंगची सुविधा – NEFT, RTGS आणि IMPS सेवा, ज्या तुमच्या आर्थिक गरजा वेळेवर आणि विश्वासाने पूर्ण करतात.

NEFT आणि RTGS मधून तुम्ही सहज मोठ्या रकमेचे व्यवहार करू शकता, तर IMPS 24/7 जलद व्यवहार सुलभ करते. या स्मार्ट बँकिंग सेवांमुळे व्यवहार जलद, सुरक्षित आणि विश्वसनीय बनतो.गरजा वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक डिजिटल युगाशी जुळवून घेण्यासाठी आजच या सेवा वापरायला सुरुवात करा!

विवेकानंद अर्बन

मोबाईल बँकिंग

बँकिंग व्यवहार अधिक स्मार्ट आणि सहज! विवेकानंद अर्बन मोबाईल बँकिंगद्वारे तुम्ही बँकेच्या रांगेपासून मुक्त होऊ शकता. मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून बॅलन्स तपासणे, फंड ट्रान्सफर करणे, बिल भरणे, किंवा व्यवहारांवरील स्टेटमेंट पाहणे — हे सगळं फक्त काही क्लिकमध्ये शक्य होतं.तेही कुठेही आणि केव्हाही.

हे अ‍ॅप वापरणं अगदी सोपं असून, कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास आमचे प्रतिनिधी मदतीसाठी उपलब्ध आहेत. व्यवहार करा – जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह! मोबाईल बँकिंगचा लाभ घ्या आणि घरबसल्या तुमचं बँकिंग फास्ट आणि कॅशलेस बनवा!

विवेकानंद अर्बन

SMS बँकिंग

विवेकानंद अर्बन आपल्या खातेदारांसाठी घेऊन आली आहे SMS बँकिंग सेवा – तुमच्या खात्यातील प्रत्येक व्यवहारावर आता सतत लक्ष ठेवणे झाले आहे अगदी सोपे! डेबिट, क्रेडिट, चेक क्लिअरन्स किंवा इतर व्यवहारांबाबत माहिती थेट तुमच्या मोबाईलवर मिळते, तेही २४x७.

ही सेवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे , ग्राहकांनी शाखेत फॉर्म भरून नोंदणी केल्यावर ती सुरू होते. खात्याशी संबंधित सर्व आवश्यक माहिती तुम्हाला आता SMS स्वरूपात, सुरक्षितपणे, वेळेत मिळणार. आजच नोंदणी करा आणि तुमचे आर्थिक व्यवहार ठेवा आपल्या हातात पूर्ण नियंत्रणात!

विवेकानंद अर्बन

QR कोड सेवा

व्यवसाय करताना रोख व्यवहारांमध्ये अनेक अडचणी येतात – सुट्टे पैसे नसणे, कॅश सांभाळण्याची चिंता, किंवा दिवसभराच्या जमा रकमेचं त्वरित व्यवस्थापन न होणं. यावर आधुनिक उपाय म्हणजे QR कोड व्यवहार – आणि विवेकानंद अर्बनने तीच सेवा आता तुमच्यापर्यंत आणली आहे.

आजच्या डिजिटल युगात किराणा दुकानदार, छोटे व्यावसायिक, प्रोफेशनल्स यांच्यासाठी QR कोड ही केवळ सोय नाही तर गरज आहे. या सुविधेच्या माध्यमातून तुम्ही सहज पैसे स्वीकारू शकता, व्यवहार सुरक्षित ठेवू शकता आणि आपल्या व्यवसायाला नव्या युगाच्या गतीने पुढे नेता येईल.

सुट्ट्यांची चिंता नाही, रोख रक्कम सांभाळायची काळजी नाही – QR कोडमुळे व्यवहार जलद, पारदर्शक आणि डिजिटल!

आजच आमच्या शाखेला भेट द्या आणि QR कोड सेवा सुरू करा !

तुम्हाला आमच्या सेवांबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, आम्हाला कॉल करा.

Go To Top