तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशांची योग्य प्रकारे बचत करण्यासाठी विवेकानंद अर्बन बचत खाते हा एक सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय आहे. या खात्यात रक्कम जमा करून नियमित व्याजाचा लाभ घेता येतो. गरजेच्या वेळी ती रक्कम सहजपणे उपलब्ध होते. हे खाते तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित करतं आणि नियोजनात मदत करतं.
आकर्षक व्याजदर, सुरक्षित व्यवहार आणि डिजिटल बँकिंगसारख्या आधुनिक सुविधा – हे खाते अल्प बचत करणाऱ्यांपासून मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे. आजच विवेकानंद अर्बन मध्ये बचत खाते उघडा आणि आर्थिक बचतीचा प्रवास सुरू करा. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या.
व्यवसायात दैनंदिन आर्थिक व्यवहारांची सतत गरज असते, आणि हे व्यवहार सोप्या पद्धतीने पार पाडण्यासाठी विवेकानंद अर्बन चालू खाते हा एक अत्यंत उपयुक्त पर्याय ठरतो. मोठ्या रकमेचे व्यवहार, मर्यादा नसलेले ट्रान्झॅक्शन, ओव्हरड्राफ्टची सुविधा आणि डिजिटल व्यवहारांची उपलब्धता यामुळे हे खाते छोट्या आणि मोठ्या व्यावसायिकांसाठी योग्य ठरतं.
मोबाईल बँकिंग, NEFT/RTGS, IMPS, चेकबुक आणि QR Code पेमेंट यांसारख्या सुविधा हे खाते अधिकच प्रभावी बनवतात. व्यावसायिक स्थैर्य आणि आर्थिक सुलभता यासाठी आजच विवेकानंद अर्बन चालू खाते उघडा आणि तुमच्या व्यवसायाला विश्वासार्ह बँकिंगचा आधार द्या.