समाजाच्या आर्थिक सबलीकरणासाठी ‘सहकार हा सर्वोत्कृष्ट मार्ग’ ही भूमिका स्वीकारत स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी,१२ जानेवारी २०२१ रोजी विवेकानंद अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना झाली.सेवा ,सहकार्य आणि समृद्धी या मूल्यांवर आधारित ही संस्था आज २४०० हून अधिक ग्राहक व सभासदांच्या विश्वासावर उभी आहे.
अल्पावधीतच संस्थेने ११ कोटींहून अधिक ठेवींचा टप्पा पार करत आर्थिक स्थैर्याची मजबूत पायाभरणी केली आहे. संस्था केवळ ठेवी आणि कर्जपुरवठा यापुरती मर्यादित न राहता NEFT/RTGS/IMPS, मोबाईल बँकिंग, QR कोड व्यवहार, आणि खातेदार केंद्रित सेवा प्रणाली अशा आधुनिक डिजिटल बँकिंग सुविधांनी सुसज्ज झाली आहे.सहकार क्षेत्रात नव्याने येणाऱ्या तरुण आणि महिला उद्योजक, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणं हे संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. संस्था पारंपरिक बँकिंग पलीकडे जाऊन व्यवहारांमध्ये आपलेपण, सल्ला, मार्गदर्शन आणि वेळेवर मदत देण्यावर विश्वास ठेवते.
पारदर्शकता, तत्पर सेवा, आणि सभासदाभिमुख दृष्टिकोन या त्रिसूत्रीवर आधारलेली विवेकानंद अर्बन संस्था, आज ‘विकासाच्या मार्गावर एक विश्वासार्ह साथीदार’ म्हणून नावारूपास आली आहे.बँकिंग सेवांपाठोपाठ सामाजिक क्षेत्रातील कार्य करण्यातही संस्था अग्रेसर आहे.
भविष्यातही अधिक शाखा, अधिक सेवा आणि अधिक जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी करत, संस्था आपल्या प्रत्येक सभासदासाठी समर्पित राहील – कारण येथे व्यवहारापेक्षा बांधिलकी महत्वाची असते.
“उठा,जागृत व्हा आणि ध्येप्राप्ती शिवाय थांबू नका…!”
स्वामी विवेकानंदांच्या या विचारांनी प्रेरित होऊन विवेकानंद अर्बनची स्थापना झाली.सेवा आणि सहकार यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण,शेतकरी, यांना आर्थिक पाठबळ देणे आणि दुर्बल घटकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे या उद्देशाने विवेकानंद अर्बन कार्य करते.१२ जानेवारी २०२१ साली संस्थेची स्थापना झाली.खरं तर तो काळ अत्यंत आणीबाणीचा होता.जगभरात कोविडने थैमान घातले होते,लोकांचे रोजगार बुडाले होते,सामान्य शेतकरी कष्टकरी निराश झाले होते.त्या काळात संस्थेने लोकांचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले,त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दिवसरात्र एक केली आणि आर्थिक प्रगतीच्या मार्गावरचा विश्वसनीय भागीदार म्हणून आपला ठसा उमटवला त्याला अनुसरून संस्था उत्तरोत्तर प्रगती करत आहे.
आज संस्थेच्या दोन शाखा,२४०० हून अधिक आनंदी ग्राहक सभासद आहेत. 'विना सहकार नाही उद्धार' हे तत्व जपतानाच, आम्ही 'बिना संस्कार नाही सहकार' या मूल्यावरही ठाम आहोत. सामाजिक भान ठेवत संस्थेच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम राबवतो आहोत.आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी प्रयत्नशील राहून प्रगती करण्याचा संस्थेचा संकल्प आहे.