पैशाला योग्य दिशा असावी लागते – अन्यथा तो कुठे खर्च होतो कळतच नाही. म्हणूनच कष्ट करून साठवलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणं महत्त्वाचं ठरतं. कारण ही गुंतवणूकच आपल्या स्वप्नांना आधार देते आणि गरज असताना उपयोगी पडते. मात्र गुंतवणूक अशी हवी की जिथे परतावाही चांगला मिळेल आणि सुरक्षितताही अबाधित राहील.
आम्ही तुम्हाला नियमित बचतीची सवय लावतो आणि ठराविक कालावधीसाठी आकर्षक व्याजदर देतो, जेणेकरून तुमची बचत अधिक भरभराटीने वाढेल. या योजनेत एका निश्चित मुदतीसाठी रक्कम जमा करता येते आणि मुदत संपल्यानंतर मूळ रक्कम व्याजासह परत मिळते. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या विवेकानंद अर्बन च्या शाखेला आजच भेट द्या. आता बचतीकडे पहिले पाऊल टाका – सुरक्षित उद्यासाठी!
जीवनात शिक्षण, विवाह, घरखरेदी अशा अनेक महत्त्वाच्या टप्प्यांसाठी आर्थिक तयारी गरजेची असते. अशा वेळी दरमहा थोडी बचत करून मोठं उद्दिष्ट साध्य करता येतं. विवेकानंद जीवन आनंद RD Scheme तुमच्यासाठी अशीच संधी आहे – नियमितपणे लहान रक्कम गुंतवा आणि ठराविक कालावधीत मिळवा मोठा परतावा.
आमचे अनुभवी कर्मचारी तुमच्या गरजेनुसार कालावधी व रक्कमेचं अचूक मार्गदर्शन करतात. आकर्षक व्याजदरही या योजनेचा भाग आहेत. लक्षात ठेवा – नियमित बचत ही फक्त सवय नसून ती भविष्याच्या आर्थिक आत्मनिर्भरतेची पहिली पायरी असते. अधिक माहितीसाठी विवेकानंद अर्बनच्या जवळच्या शाखेला भेट द्या.