समाजाच्या आर्थिक सबलीकरणासाठी ‘सहकार हा सर्वोत्कृष्ट मार्ग’ ही भूमिका स्वीकारत स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी,१२ जानेवारी २०२१ रोजी विवेकानंद अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना झाली.सेवा ,सहकार्य आणि समृद्धी या मूल्यांवर आधारित ही संस्था आज २४०० हून अधिक ग्राहक व सभासदांच्या विश्वासावर उभी आहे.
पारदर्शकता, तत्पर सेवा, आणि सभासदाभिमुख दृष्टिकोन या त्रिसूत्रीवर आधारलेली विवेकानंद अर्बन संस्था, आज ‘विकासाच्या मार्गावर एक विश्वासार्ह साथीदार’ म्हणून नावारूपास आली आहे.बँकिंग सेवांपाठोपाठ सामाजिक क्षेत्रातील कार्य करण्यातही संस्था अग्रेसर आहे.
विश्वासाची ठेव, वाढत्या गुंतवणुकीसह!
दिवसेंदिवस वाढणारा परिवार, समाधानाचा विश्वास!
Happy Clients
Total Transection
Branchs in USA
नवीन खाते उघडताना सर्व प्रक्रिया खूप सोपी आणि जलद होती. कर्मचारी अतिशय मदतीचे आणि मार्गदर्शन करणारे आहेत.
व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज जलद मिळालं. कमी व्याजदर आणि सोपी प्रक्रिया यामुळे फारच समाधान वाटलं. आज माझा उद्योग वाढतोय, त्या मागे संस्थेचे मोलाचं योगदान आहे.
मोबाईल बँकिंग अॅप वापरणं अतिशय सोपं आहे. घरी बसून सगळे व्यवहार करता येतात, हे खूपच उपयोगी वाटतं. डिजिटल सेवा उत्तम आणि वापरायला सोपी आहे.
माझं मुदत ठेव खाते सहज उघडलं गेलं आणि उत्तम व्याजदर मिळाला. सेवेचा दर्जा पाहता इथं गुंतवणूक सुरक्षित वाटते. ग्राहक म्हणून मला इथं विशेष आदर आणि आत्मीयता मिळते.
माझ्या छोट्या व्यवसायासाठी तात्काळ आर्थिक मदतीची गरज होती. येथे मला कमीत कमी कागदपत्रांवर झटपट कर्ज मिळालं. या मदतीने मी माझा व्यवसाय पुढे नेऊ शकले, त्यामुळे आता माझा आत्मविश्वास वाढला आहे.